कॉल 1917 या 26594500/ 61564500

Mahanagar Gas

होमआरोग्य, सुरक्षितता आणि पर्यावरण

एमजीएल एचएसइ धोरण

 

एमजीएलचा असा विश्वास आहे की अद्वितीय व्यावसायिक कामगिरीसाठी, आपल्या कामकाजामुळे प्रभावित होणाऱ्या लोकांच्या, आपल्या भौतिक मत्तांच्या, आपल्या प्रतिष्ठेच्या आणि पर्यावरणाच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या संरक्षणात अद्वितीय एचएसइ कामगिरीची आवश्यकता असते.

शून्य दुखपती हे आमचे लक्ष्य आहे कारण त्या सर्व टाळता येण्यासारख्या आहेत. आम्ही आमचा व्यवसाय जबाबदार पद्धतीने करतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आलेल्या चांगल्या पद्धतींचे पालन करतो. एचएसइ कामगिरी ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि आपल्यापैकी प्रत्येकाचे असुरक्षित कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे आणि एचएसइ नेतृत्वाचे प्रत्यक्षिक दाखवून त्या मार्फत चांगल्या वर्तनाप्रती दृढपणे प्रतिबद्ध वचनबद्ध राहण्याचे कर्तव्य आहे. आमच्या सर्व कामकाजांत सुरक्षितता हा आमच्या व्यवसायातील यशाचा महत्त्वाचा घटक आहे.

धोरण राबविताना आम्ही खात्री करू की:

 • व्य़वस्थापनाच्या निर्णयांमधून आमच्या एचएसइचे हेतू प्रतिबिंबीत होतील.
 • आमच्या एचएसइ व्यवस्थापन यंत्रणेतून उद्योगातील सर्वोत्तम पद्धती प्रतिबिंबीत होतात आणि तिला चांगली संसाधने पुरविण्यात आली आहेत.
 • शिकलेल्या धड्यांपासून कारवाई करून आमच्या एचएसइ कामगिरीत सातत्याने सुधारणा केली जाईल;
  • कामाशी संबंधित आजारपणे, अपघात आणि घटना टाळणे,
  • प्रदूषणाला प्रतिबंध करणे आणि
  • पर्यावरणीय उत्सर्जने, कचरा आणि उर्जेचा वापर कमीत कमी करणे.
 • आमच्या व्यवसायाचे कामकाज करण्यासाठी आणि ज्या त्याच्या पर्यावरणविषयक पैलूंशी आणि ओएचअँडएस जोखमींशी निगडित आहेत अशा सर्व कायदेशीर आवश्यकतांचे तसेच एमजीएल लाइफ सेवर्सचे अनुपालन करणे.
 • सर्व कर्मचारी सक्षम आहेत आणि त्यांचे उत्तरदायित्व, आवश्यक वर्तन आणि अनुपालन न करण्याचे परिणाम यांची त्यांना समज आहे याची खात्री करण्यासाठी त्यांना निर्देश, शिक्षण, प्रशिक्षण आणि पर्यवेक्षण पुरविणे.
 • आमचे कंत्राटदार आणि पुरवठादार त्यांची एचएसइ उत्तरदायित्वे आणि आवश्यक वर्तने समजतात, आमच्या आकांक्षांमध्ये त्यांच्याही वाट उचलतात आणि अनुपालन न करण्याच्या परिणामांची त्यांना जाणीव आहे याची खात्री करणे. आम्ही एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करू आणि त्यापासून शिकू.
 • आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारलेल्या एचएसइमधील चांगल्या पद्धती अंमलात आणण्यासाठी आणि एकमेकांच्या अनुभवांपासून सातत्याने शिकत राहण्यासाठी आमच्या भागीदारांबरोबर काम करणे.
 • आमच्या सुविधांच्या संपूर्ण जीवन चक्रांत, डिझाइन, उभारणी आणि कामकाजाप्रती एक जोखीम आधारित दृष्टीकोन पत्करणे.
 • आघाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'सुरक्षा आणि तांत्रिक सक्षमता (एसटीसी) नाही, काम नाही' पद्धतीमार्फत शिक्षण देणे.
 • आमच्या सर्व हितसंबंधियांना सामील करून घेणे आणि त्यांचा सल्ला घेणे आणि एचएसइवरील त्यांच्या चिंता विचारात घेणे.
 • आमच्या कामगिरी समवेत आमच्या एचएसइ उद्दिष्टांवर अहवाल देणे आणि एचएसइ पद्धतींत सुधारणा करण्यासाठी उद्योग आणि सरकारी एजन्सीज् बरोबर काम करणे.
 • आमच्या धोरणाचा वापर पर्यावरणविषयक आणि ओएचअँडएस उद्दिष्टे आणि लक्ष्ये निश्चीत करण्यासाठी आणि त्यांचा आढावा घेण्यासाठी एक चौकट म्हणून करणे.